logo

Call Now:+91 9867807837

Call Now:+91 9867807837

दुर्गांचा प्रवास दुर्गांसाठी

"राज्याचे सार हे दुर्ग"
शिवकाळातील हे वाक्य आज आपण गेले कित्येक वर्ष जुन्या ग्रंथ साधनेतून वाचत आलेलो आहोत. शिवछत्रपतींच्या जीवनातील पूर्वार्ध व उत्तरार्ध हा सुध्दा "दुर्ग" या विचारांशी जोडला गेलेला आहे. शिवछत्रपतींचा जन्म, बालपण, तारुण्य, शिवराज्यभिषेक सोहळा आणि अकल्पनीय अशा लढाया या सह्याद्रीतील याच गडकोटांवर झाल्या आणि त्यांनी शेवटचा श्वासही याच गडाच्या कुशीत घेतला. शिवछत्रपतींनी दुर्ग या संस्कृतीला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यापासून ते थेट औरंगजेब पर्यंत मजल मारण्यासाठी याच महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला गडकोट व दुर्गांचा उपयोग केला. आज दुर्ग संस्कृती काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. याच दुर्ग संस्कृतीला नवसंजीवन देण्याचे काम महाराष्ट्रातील "दुर्गवीर प्रतिष्ठान" करत आहे. २००८ मध्ये सुरु झालेला हा प्रवास सुरगड, मानगड, अवचितगड, मृगगड त्याचप्रमाणे सातारा, कोल्हापूर, नाशिक या प्रांतात दुर्ग संवर्धनाबद्दल जनजागृती करीत इथपर्यंत पोहोचला आहे. आपण सुद्धा गडकोट संवर्धनाबाबत जागृत होण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हा आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार व्हा...
•|| यळकोट यळकोट जय मल्हार ||•
•|| गडकोट गडकोट जय शिवराय ||•

Please enter the details

Name
Email
Fort
Contact No
Message
 

©2019 DreamTravelkar. All Rights Reserved.